ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर कडाडलेझेंडू २०० रुपये, तर निशिगंध ६०० रुपये किलो
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. झेंडू २००, तर निशिगंधाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. श्रावण महिन्यात आवक कमी असली तरी मागणीही कमी होती, त्यामुळे फारशी दरवाढ झाली नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढू लागली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसत असून दरात मोठी वाढ झाली आहे.
झेंडू २००, गलाटा २००, शेवंती २२५, निशिगंध ६०० रुपये किलो झाल्याने किरकोळ बाजारात विक्री करायची कशी? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. गुलाबाच्या दरातही वाढ झाली असून घाऊक बाजारात १० फुलांची पेंढी ४० रुपयांना झाली आहे.