शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

कोल्हापुरात लोकनृत्य महोत्सव; सहा राज्यांतील १०० कलाकार सहभागी

By संदीप आडनाईक | Published: September 09, 2023 1:00 PM

कवठेमहाकांळच्या धनगरी गजनृत्याला टाळ्यांचा प्रतिसाद

कोल्हापूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या लोकनृत्य भारत भारती महोत्सवास शुक्रवारी पारंपरिक लोकनृत्याने प्रारंभ झाला. कोल्हापुरातील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हा महोत्सव सुरू आहे. रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात सहा राज्यांतील शंभराहून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील कवठेमहंकाळच्या धनगरी गजनृत्याला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांत आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत संस्कृति मंत्रालय, राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूरात हा महोत्सव सुरु झाला.राजस्थानच्या सुप्रसिध्द मांगनियार लोकगीतातील गणेशवंदनाने महोत्सवात प्रारंभ झाला. यानंतर मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रांताचे प्रसिध्द बधाई नृत्य कलाकारांनी सादर केले. पाठोपाठ छत्तीसगढ प्रदेशात स्यायिक सतनामी समाजाचे पारंपरिक पंथीनृत्य, राजस्थानच्या सपेरा जनजातीय महिलांनी सादर केलेले कालबेलिया नृत्य, महाराष्ट्रातील कवठेमहंकाळच्या धनगरी गजनृत्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. यानंतर ओडिसाच्या संबळपुरी नृत्य, गुुजरातचे प्रसिध्द दांडिया रास, पश्चिम बंगालच्या कलाकारांनी सादर केलेल्या छाउ नृत्यांने प्रेक्षकांची मने जिंकली.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रम सहाय्यक राजेश खडसे, सागर बगाडे, प्रमोद पाटील, चित्रकार संजय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर