राजर्षी शाहू यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी लोकचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:06 AM
< p >कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील ...
<p>कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील संस्था, संघटना आणि नागरिकांनी आपली पत्रे माझ्याकडे पाठवावीत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे केले.खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ हा किताब जाहीर व्हावा, अशी मागणी संसदेमध्ये मी केली; पण केंद्र सरकारकडून हा सर्वोच्च नागरी किताब मिळवायचा असेल, तर लोकचळवळ उभारण्याची गरज आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला सोबत घेऊन, नवी लोकचळवळ उभारली जाणार आहे. तिची सुरुवात पत्र, ठराव आणि प्रस्ताव जमा करण्यापासून होणार आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील संस्था, संघटनांनी हिंदी अथवा इंग्रजीत पत्र तयार करावे. त्यासह नागरिकांनी वैयक्तिकपणे पत्रे लिहून ती माझ्याकडे जमा करावीत. सर्व पत्रे आणि प्रस्ताव एकत्र करून, अन्य काही लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून,राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळावा, अशी विनंतीकेली जाईल. त्यासाठी कोल्हापूरकरांच्या भावना त्या पत्रांद्वारे सादर करतील. कोल्हापूरसह राज्यातील काही खासदारांचे शिष्टमंडळ बनविले जाईल. कोल्हापूरची जनभावना आणि खासदारांची एकत्र ताकद पणाला लावून, राजर्षी शाहू महाराज यांना हा सर्वोच्च किताब मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. दि. २५ आॅगस्टपर्यंत कोल्हापुरातील राजेश मोटर्सशेजारील माझ्या कार्यालयात आपले पत्र, ठराव, प्रस्ताव पोस्ट अथवा ई-मेलद्वारे जमा करावेत.‘लोकमत’ने मांडला मुद्दाकुणाला ‘भारतरत्न’ द्यावा, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेत असल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आहे. देशात व राज्यातही भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पंतप्रधानांकडे राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ‘लोकमत’ने शनिवार (दि. २८)च्या अंकात ‘राजर्षी शाहूंचा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातात’ या वृत्ताद्वारे मांडली. त्यानंतर हा किताब मिळविण्याच्या दिशेने लोकचळवळ उभारण्याचे पडलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सर्व खासदारांना ‘शाहूचरित्रा’सह पाठविणार पत्रया किताबासाठीच्या मागणीला समर्थन द्यावे, यासाठी देशातील सर्व खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व आमदारांना पत्रे पाठविणार आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याची महती या सर्व खासदारांना समजावी यासाठी त्यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘शाहू चरित्र’ची इंग्रजी भाषेतील आवृत्ती या पत्रासमवेत पाठविणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.