कबनूर : थकीत बिलप्रश्नी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील रेणुका शुगर्सच्या (पंचगंगा) प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर कारखाना प्रशासनाने बारा कोटी रुपयांची थकीत बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाल्यानंतर आंदोलक शांत झाले. दरम्यान, आज, गुरुवारी पंचगंगेच्या ऊस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर ऊस बिले जमा होणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उसाची थकीत बिले मिळावीत, या मागणीसाठी शरद, पंचगंगा, दत्त, गुरुदत्त या साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले. इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याने शेवटच्या टप्प्यातील एफआरपी व बिले अद्याप शेतकºयांना दिलेली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यातील अधिकाºयांना सर्व बिले तत्काळ मिळावीत, यासाठी धारेवर धरले. त्वरीत निर्णय दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर कारखान्याच्या अधिकाºयांनी अखेर सायंकाळी शेवटच्या टप्प्यातील सुमारे बारा कोटी रुपयांची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेअंती कारखान्यांनी एक रकमी विनाकपात एफआरपी व अधिक प्रति टन २०० रुपये द्यावेत असा फार्म्यूला ठरवला होता. रेणुका शुगर्सने दि. ३१ डिसेंबर २0१७ अखेर आलेल्या उसाला ठरल्याप्रमाणे दर दिला; पण नंतर २५०० रुपये प्रतिटन शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली. उर्वरित रक्कम दोन महिन्यांत देऊ, असे कारखान्याने आश्वासन दिले होते. त्यानंतर साखरेच्या दराचे कारण पुढे करून बिल दिले नाही. त्यामुळे १६ फेब्रुवारी ते २२ मार्चपर्यंतची रक्कम गेल्यापाच महिन्यांपासून थकीत आहे. ही ४६४ रुपये प्रतिटनाची रक्कम देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.
यावेळी जि. प. माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंधर पाटील, आदिनाथ हेमगिरे, आप्पा एडके, वैभव कांबळे, सागर शंभूशेटे, राजाराम देसाई, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.बिलासाठी ‘शरद साखर’ला निवेदनखोची : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने थकीत ऊस बिल मिळावे यासाठी निवेदन दिले.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी निवेदन स्वीकारले. एफआरपीप्रमाणे थकलेली रक्कम शेतकºयांना द्यावी यासंदर्भातील हे निवेदन होते. तसेच अधिक दोनशे रुपये द्यावेत, अशी मागणी यात केली आहे. यावेळी राजेंद्र पाटील व संघटना कार्यकर्त्यांमध्ये साखर उद्योगातील परस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. पैसे उपलब्ध झाल्यावर लगेच शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जातील, असे यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे अनिल मादनाईक,भगवान काटे, जालिंदर पाटील, शिवाजी पाटील, आप्पासो एडके, आदिनाथ हेमगिरे, वैभव कांबळे, सागर शंभूशेटे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पिराचीवाडी गावतलावाच्या गाळमुक्तीसाठी लोकचळवळबोरवडे : कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावातील महिलांनी तसेच गावातील होतकरू तरुणांनी संघटित होऊन लोकसहभागातून पहिले स्वच्छतेचे पाऊल उचलत शिवकालीन तलाव गाळमुक्त करण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. यासाठी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत सामाजिक बांधीलकीतून या विधायक उपक्रमाची सुरुवात केली आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ असाच प्रत्यय पिराचीवाडी गावातून येत आहे.पिराचीवाडी हे गाव उंच ठिकाणी वसल्याने आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथे भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली होती. किल्ल्यावर घोड्यासाठी तबेला, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, तलाव, किल्ल्याची तटबंदी तब्बल १० फूट रुंद असून, या तटबंदीवरून तोफा सहजपणे फिरविता येतील, अशी रचना केल्याचे दिसून येते. सन १९६० पर्यंत या किल्ल्याचे सात बुरूज सुस्थितीत होते. त्यापैकी बदलत्या काळात सध्या एकच बुरूज शिल्लक राहिला आहे. खंदकाच्या बाहेरूनही सर्व बाजूंनी मोठा संरक्षक तट होता. ब्रिटिश काळात इंग्रजांनी या किल्ल्याची दुरवस्था केली. डोंगराळ भागात असल्याने गावात पाणीप्रश्न नेहमी पाचवीला पूजलेलाच आहे. पाण्यासाठी या खंदकातील पाण्याचा आधार घ्यावा लागत असे. कालांतराने गाळाने हा खंदक पूर्ण भरला व तलावातही मोठ्या प्रमाणात गाळ साचला. कठड्यावरती झाडे-झुडपे वाढली. त्यामुळे पाणीसाठा कमी होऊ लागला व पाण्याचा प्रश्न गावकऱ्यांना सतावू लागला. त्यामुळे नाथाजी भोसले, जयवंत भोसले, पांडुरंग रोडे, दिनकर भोसले, भिवाजी डावरे, बाळासो गौड, शिवाजी पाटील, बंटी पाटील, रामदास भोसले, आदींनी समरजित घाटगे यांची भेट घेऊन पाणीप्रश्नाबाबत चर्चा केली. त्यांनी तत्काळ राजे फौंडेशनमार्फत कामास सुरुवात केली. दोन जेसीबी, एक पोकलँड व दहा ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुुरू आहे.पिराचीवाडी (ता. कागल) येथील ऐतिहासिक शिवकालीन तलावातील ग्रामस्थ व राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनच्यावतीने लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.