लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्षांसह पंतप्रधानांकडे पाठपुरावा करा, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी खासदार संजय मंडलिक यांना देण्यात आले.
राज्य शासनाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यासाठी राज्यघटनेची १०२ वी दुरुस्ती व इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाने जरी पुनर्याचिका दाखल केली असली तरी त्याला खूप वेळ लागणार आहे. यासाठी लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती यांना पत्राद्वारे राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठा आरक्षणासाठी सध्याची सर्वोच्च न्यायालयातील लढाईशिवाय समाजाला जर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवायचे असेल तर ते ओबीसी कोट्यातूनच मिळविले पाहिजे, अशी आपली मागणी आहे. तरी आपण आरक्षणासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रा. जयंत पाटील, निवास साळोखे, महेश जाधव, ॲड. बाबा इंदुलकर, सुजित चव्हाण, बाबा पार्टे, अजित राऊत, राजू लिंग्रस, जयेश कदम, दिलीप देसाई, ऋतुराज माने, महादेव पाटील, अमित अतिग्रे, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे केली. या वेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, निवास साळोखे, महेश जाधव, सुजीत चव्हाण, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२८०६२०२१-काेल- मराठा ) (छाया- नसीर अत्तार)