संकेश्वर : कोरोनाचा साखळी तोडण्यासाठी आणि दुसऱ्या लाटेतील कोरोना प्रसाराचा वेग लक्षात घेता सर्वांनी शासनाच्या नियमांचे कठोर पालन करावे. कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार डॉ. शिवानंद हुगार यांना दिला.
संकेश्वर येथे व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सीमा हतनुरे होत्या.
तहसीलदार हुगार म्हणाले, तालुक्यात आजपर्यंत २० कोरोनाबाधित आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ४ रुग्ण हे संकेश्वर शहरातील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कर्नाटक राज्याला महाराष्ट्राची सीमा लागून असल्याने चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. मात्र, राज्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांवर नियमांचे पालन करावेच लागेल. कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमेवरील अनेक गावांतील शेतकऱ्यांची शेती दोन्ही राज्यांच्या हद्दीत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे.
मुख्याधिकारी जगदीश इटी यांनी स्वागत केले. बैठकीस व्यापारी, नगरसेवक उपस्थित होते.
------------------------
* फोटो ओळी : संकेश्वर येथे व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत तहसीलदार डॉ. शिवानंद हुगार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्षा सीमा हतनुरे, मुख्याधिकारी जगदीश इटी आदींची उपस्थिती होती.
क्रमांक : २१०४२०२१-गड-१०