समीर देशपांडेकोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकार आरोग्यावर अब्जावधी रुपये खर्च करीत असताना अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये मोजकेच रुग्ण तब्येत दाखवण्यासाठी जात असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, यातील काही आरोग्य केंद्रांवर दिवसाला आठ आणि दहाच ग्रामस्थ जातात, अशी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांची गर्दी आणि काही केंद्रे मात्र रुग्णांविना ओस असे विरोधाभासी चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे; परंतु हेच ग्रामस्थ शेजारच्या मोठ्या गावात खासगी रुग्णालयात का जातात, याचेही संशोधन होण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी रुग्ण कमी येतात अशा ठिकाणी डॉक्टरांनीही आपली सेवा दर्जेदार देण्याची गरज असून ग्रामस्थांनीही याचा लाभ घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र - ७५एकूण डॉक्टर्स- १६०
जिल्ह्यातील दोन दिवसांची ओपीडी किती?- ० ते १० रुग्ण : अडकूर, कोवाड, माणगाव, कानडेवाडी, माण, मुंगूरवाडी,- ११ ते २० रुग्ण : वाटंगी, हासूर, करंजफेण, परळी निनाई, मडिलगे, पिंपळगाव, महागाव, घालवाड, पोर्ले, मांजरे, शित्तूर वारुण,-२१ ते ३० रुग्ण : पाटगाव, कडगाव, निवडे, भादवण,
- ३१ ते ४० रुग्ण : कडगाव, मिणचे खुर्द, कानूर खुर्द, हलकर्णी, नूल, गारिवडे, सरवडे, बाजार भोगाव, पडळ, तारळे, मलिग्रे, सिद्धनेर्ली, कणेरी, शिरोली दुमाला, वडणगे, बाजार भोगाव, पडळ, आंबा, सरूड- ४० पेक्षा जास्त रुग्ण : उत्तूर, अंबप, भादोले, हर्ले, हुपरी, पट्टणकोडोली, पुलाची शिरोली, साजणी, पिंपळगाव, कळे, केखले पोखले, धामोड, राशिवडे, सरवडे, ठिकपुर्ली, वाळवे, अब्दुल लाट, दानोळी, जयसिंगपूर, नांदणी, नृसिंहवाडी, सैनिक टाकळी चिखली, कापशी, कसबा सांगाव, पिंपळगाव, भुये, इस्पुर्ली, मुडशिंगी, सांगरूळ, उचगाव, बोरपाडळे, बांबवडे, भेडसगाव.उपजिल्हा रुग्णालयातही तेचजिल्ह्यात १३ उपजिल्हा रुग्णालये आहेत. मात्र, या ठिकाणी दिवसाला किमान २५ पासून पुढे रुग्ण तपासण्यासाठी येत असतात. शक्यतो संपूर्ण तालुक्यासाठी किंवा दोन तालुक्यांसाठी एक उपजिल्हा रुग्णालय असल्याने तसेच उपचार, शस्त्रक्रियेची सोय असल्याने या ठिकाणी रुग्णसंख्या वाढती असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असणारी काही प्राथमिक आरोग्य केंद्रे ही अतिशय दुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथील ओपीडी कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, अशा ओपीडी कमी असणाऱ्या आरोग्य केंद्रांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, याच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहे. -डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर