कोल्हापूर : जिल्ह्यात गुुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहीला. अधून-मधून काही वेळ उघडीप मिळत असल्याने नागरीकांना दिलासा मिळत होता, तर पंचगंगा नदीची कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी ही दोन फूटांनी कमी आली असून सायंकाळी २१ फूट होती.
जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. जिल्ह्यात दिवसभरात सुमारे १६५ मि.मी.पाऊस झाला असून जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहीला. शहरात सकाळी व दुपारी काही वेळ पावसाने उघडीप दिल्याने नागरीकांना दिलासा मिळाला. पावसाची दिवसभर रिपरिप कायम राहिली. त्यामुळे नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने शहरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या सखल भागात पाणी साचल्याने त्यातून माग काढताना नागरीकांना कसरत करावी लागत होती.कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा व चंदगड या तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. तर शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पावसाचा जोर मंदावला होता. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरीही कोठेही पडझडीच्या घटना घडलेल्या नाहीत.अद्याप ११ बंधारे पाण्याखालीचजिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहील्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. पंचगंगा नदीची कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्यानजीक पाणी पातळी दोन फूटांनी कमी झाली असून गुरुवारी सायंकाळी ती २१ फूट होती.