ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पशाळेत एक घोणस जातीच्या सर्प मादीने जन्म दिलेल्या तब्बल ३० पिल्लांना वन विभागाने जंगलात मूळ अधिवासात सोडून दिले.
ढोलगरवाडी येथील सर्पशाळेत एक घोणस जातीच्या सर्प मादीने तब्बल ३० पिलांना जन्म दिला. त्यांचे पालन पोषण करणे अशक्य असल्याने त्यांना निसर्गाच्या हवाली करण्यासाठी प्रा. सदाशिव पाटील यांनी प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांना कल्पना दिल्यानंतर पाटील त्यांनी कार्यकर्त्यांसह सर्पशाळेस भेट देऊन पाहणी करून सापाविषयी माहिती घेतली. त्यानंतर प्रा. पाटील यांनी घोणस सापाची पिले वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर दाट जंगलात सोडण्यात आली.
यावेळी वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक दीपक कदम, गणेश बोगरे, वनकर्मचारी विश्वनाथ नार्वेकर, शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. साप जीवन साखळीतील एक महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
यावेळी 'साप वाचवा, शेती वाचवा' असे आवाहन प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले.
फोटो ओळी : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पशाळेतील घोणस जातीच्या सापाच्या एका मादीने दिलेल्या ३० पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
क्रमाक : २००७२०२१-गड-०४