शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मुलांच्या प्रवेशाचे ‘टेन्शन’ विसरा...

By admin | Published: March 25, 2015 11:56 PM

‘लोकमत’मिशन अ‍ॅडमिशन प्रदर्शनाचा आज प्रारंभ : नर्सरी ते दहावीपर्यंतच्या शाळा, प्रवेशाची एकाच छताखाली माहिती

कोल्हापूर : मार्चच्या अखेरीस मुलांच्या प्रवेशासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या शाळांची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. त्यासाठी शाळांची शोधाशोध त्यांना करावी लागते. त्यावर पालकांची अशा स्वरूपातील धावपळ टळावी आणि त्यांचा वेळ, पैशांची बचत व्हावी या उद्देशाने ‘लोकमत’ने कोल्हापुरात ‘मिशन अ‍ॅडमिशन - समर कॅम्प एक्स्पो २०१५’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज, गुरुवारपासून तीन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत कमला कॉलेजजवळच्या व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, साई सर्व्हिस प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धेश्वर कोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शाळा प्रवेशाची साद्यंत माहिती ‘मिशन अ‍ॅडमिशन’मध्ये एकाच छताखाली मिळणार आहे. पालकांना मुलांच्या शाळा प्रवेशाचे मोठे टेन्शन असते. यात त्यांना घरापासून जवळ असलेल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेचा शोध घेणे, त्या शाळेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रवेश शुल्क किती आणि त्याची आकारणी कशी होते, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने कोणते उपक्रम शाळा राबविते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतात. त्यासाठी त्यांची धावपळ होते. पालकांची ही धावपळ ‘मिशन अ‍ॅडमिशन’मुळे थांबणार आहे. यात शाळांच्या सुविधा, शुल्क आणि विविध उपक्रमांची माहिती, अशा स्वरूपातील मुलांच्या प्रवेशाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पालकांना एकाच छताखाली मिळणार आहेत. शाळांच्या प्रतिनिधींशी पालकांना प्रत्यक्षात चर्चा करता येणार आहे. शाळांनादेखील पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी या प्रदर्शनाने उपलब्ध करून दिली आहे. प्रवेशापासून ‘डाएट प्लॅनिंग’पर्यंत या प्रदर्शनामध्ये शाळा, कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अबॅकस, अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट, आर्ट अँड क्राफ्ट, करिअर मार्गदर्शन, सर्व प्रकारचे स्पोर्टस कोचिंग क्लासेस, नृत्य, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, संगीत वाद्ये, स्मरणशक्ती, योगासन, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश कोर्सेस, बुद्ध्यांक मूल्यमापन मार्गदर्शन ते मुलांच्या आहाराबाबत ‘डाएट प्लॅनिंग,’ आदी स्वरूपातील माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)प्रदर्शनाची वैशिष्ट्येप्रदर्शनात कोल्हापुरातील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या नामवंत शाळांचा सहभागमाहिती मिळविण्यासह स्पर्धांतून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीकोल्हापुरात ‘लोकमत’ने शाळा प्रवेशाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे ‘मिशन अ‍ॅडमिशन - समर कॅम्प एक्स्पो २०१५’ प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी होणार आहे. त्यासाठी कमला कॉलेजजवळील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात जय्यत तयारी करण्यात आली असून, प्रदर्शनातील स्टॉल सज्ज झाले आहेत.बालविकास मंचतर्फे ‘ध... धमाल’ स्पर्धाप्रदर्शनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे ‘ध... धमाल’ स्पर्धा होणार आहेत. यात गुरुवारी दुपारी तीन वाजता निबंधलेखन स्पर्धा होईल. ‘माझी शाळा’ असा स्पर्धेचा विषय आहे. शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीन वाजता ‘टॅलेंट हंट,’ शनिवारी (दि. २८) सायंकाळी ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘कौन बनेगा स्मार्ट’ स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.