आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन
इचलकरंजी : लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे, या मागणीचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना दिले.
निवेदनात, लॉकडाऊन काळात सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडल्यामुळे कामगार व कष्टकरी जनतेला घरीच राहावे लागले. त्यामुळे विजेची बिले भरणे नागरिकांना शक्य नाही. म्हणून विविध पक्ष व संघटनांनी या काळातील लाईट बिल महाराष्ट्र सरकारने माफ केले पाहिजे. या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने केली.
विधानसभा अधिवेशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडणार नसल्याचे आणि ज्यांचे वीज कनेक्शन तोडले असेल त्यांचे जोडून देण्याची घोषणा केली होती; मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिलेले आश्वासन न पाळता महावितरण कंपनी अडचणीत असल्याने सर्वांनी लाईट बिल भरावे जे भरणार नाहीत त्यांचे कनेक्शन तोडले जाईल असे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीचा विचार करुन वीज बिल माफ करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार आवाडे यांच्याकडे केली. यावेळी दत्ता माने, शिवगोंडा खोत, भरमा कांबळे, सदा मालाबादे, ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीचे निवेदन माकपने आमदार प्रकाश आवाडे यांना दिले.