कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मिळालेली रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतक-यांच्या मुलांची प्राथमिक ते पदवीधर शैक्षणिक क्षेत्रातील एक वर्षाची फी प्रशासनाने माफ करावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे रब्बी व खरीप पिके कुजली आहेत; त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मुलांची शैक्षणिक फी भरणेही जिकिरीचे झाले आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाकडून या एक वर्षाची फी माफ करून जनतेचा पोशिंदा शेतकरी राजाच्या मुलांसाठी ही सवलत मिळावी.यावेळी जिल्हा संघटक राजीव सोरटे, विश्वास कांबळे, सतीश कासे, पन्नालाल इंगळे, चंद्रकांत काळे, अमोल कांबळे, मनोहर खोत, प्रकाश साळोखे, सागर घोलप, प्रकाश गोंधळी, तुकाराम कांबळे, आदी उपस्थित होते.