शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Navratri : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई वैष्णवी देवीच्या रूपात, पर्यटकांचा ओघ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 6:15 PM

शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरूप असून सप्तमातृकांपैकी एक आहे.

ठळक मुद्देकरवीरनिवासिनी श्री अंबाबाई वैष्णवी देवीच्या रूपात, सहाव्या दिवशी पर्यटकांचा ओघ सुरुच

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरूप असून सप्तमातृकांपैकी एक आहे.नवरात्रौत्सवात सहाव्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर श्री अंबाबाईची वैष्णवी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही देवी म्हणजे विष्णुचे स्त्रीरूप अथवा विष्णुशक्ती असून, सप्तमातृकांपैकी एक आहे. मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवतेचा उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी ज्या मातृकांची निर्मिती केली, त्यातील ही एक मातृका.

देवीमहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभाच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या, त्यात वैष्णवीचा उल्लेख येतो. वैष्णवी म्हणून विष्णुसारखी शंख, चक्र-गदा-पद्मधारण करणारी. गरूडासना. हिला संध्यावदनामध्ये यजुर्वेदीरूपी माध्यान्ह गायत्री म्हणजेच दुपारच्या सूर्याची देवता मानतात. ही पूजा सारंग मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर यांनी बांधली.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर