शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:53 PM

कोल्हापूर : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. ...

कोल्हापूर : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागलमध्ये आज, शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता कागलमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी जयंत पाटील मुंबईहून खास विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री घाटगे यांची त्यांच्या नागाळा पाकमधील निवासस्थानी भेट घेत आणि त्यांच्याशी चर्चा करत मनधरणी केली होती. मात्र यावेळी मी फार पुढे गेलो आहे आता मागे फिरणे अशक्य आहे अशा स्पष्ट शब्दात समरजित घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. यावेळी समरजित घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले. समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशावर आज शिकामोर्तब झाला.

सोशल मीडिया अकाऊंटवरून  कमळ हटवलंकाल, गुरुवारी झालेल्या महायुतीच्या तपोवन मैदानावरील महिला मेळाव्याला एकीकडे दांडी मारतानाच त्यांनी दुपारनंतर आपल्या फेसबुक अकाऊंटवरून कमळ चिन्हही हटवले आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात आता पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीचे तर समरजित घाटगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार अशी लढत निश्चित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेvidhan sabhaविधानसभाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस