शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत

By राजाराम लोंढे | Published: April 24, 2024 4:29 PM

कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (सांगरुळ, ता. करवीर) यांना पक्षातून सहा वर्षासाठी आज, बुधवारी निलंबीत करण्यात ...

कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (सांगरुळ, ता. करवीर) यांना पक्षातून सहा वर्षासाठी आज, बुधवारी निलंबीत करण्यात आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी बुधवारी ही कारवाई कारवाईचे आदेश काढले.बाजीराव खाडे हे ‘कोल्हापूर’मधून इच्छुक होते. त्यांनी गेल्या सहा महिने संपर्क मोहीम राबवली होती. मतदारसंघात सगळीकडे त्यांनी बॅनरबाजी करत वातावरण तयार करण्यास सुरुवात केली होती. पण, पक्षाने शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना थांबण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींनी दिला होता. तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारीरमेश चेन्नीथला, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.पण, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहिले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमातून काँग्रेस नेतृत्वावर थेट हल्ला चढवला. त्यामुळे पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्यांच्यावर कारवाई केली.खाडे यांनी युवक काँग्रेस ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले होते. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. सध्या ते काँग्रेसचे सहयोगी प्रदेश प्रतिनिधी होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस