शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:02 IST

'मागच्या दाराने येणार नाही'

कोल्हापूर : भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मी फार पुढे गेलो आहे आता मागे फिरणे अशक्य आहे अशा स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री घाटगे यांची त्यांच्या नागाळा पाकमधील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.महाडिक म्हणाले, तुम्ही गेली दहा वर्षे कष्ट घेतलेले आहेत. भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये योगदान दिलेले आहे. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये आपली अडचण झाली आहे हे आम्ही समजून आहोत. तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा.यावेळी समरजीत घाटगे म्हणाले, पक्षाचेच चिन्ह घेऊन गेली अनेक वर्षे मी काम करत आहे. एकही दिवस विश्रांती घेतली नाही. पक्षाचे चिन्ह मतदारसंघात पोहोचवले. परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की आता जागा वाटपामध्ये भाजपला फारसा वाव नसला तरी मला थांबणे शक्य नाही. मी पुढे गेलो आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी आमदार अमल महाडिक, प्रदेश कार्यकारिणी सचिव महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम हे उपस्थित होते. महायुतीच्या आज होणाऱ्या जाहीर सभेला घाटगे यांनी उपस्थित राहावे अशी विनंती त्यांना करण्यात आली परंतु याबाबतही नकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.

मागच्या दाराने येणार नाहीआपण गेली दहा वर्षे मतदारसंघात काम केले आहे. अनेक प्रश्न मांडले आहेत. अनेक प्रश्न सोडवले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विधानपरिषदेसारख्या मागच्या दाराने येणे पसंत नसल्याची भूमिकाही ही यावेळी घाटगे यांनी मांडल्याचे समजते. त्यामुळे अन्य कोणत्यातरी पक्षातर्फेच मला लढत द्यावी लागेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक