कोल्हापूर : कागलचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय घाटगे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत मंत्रालयात सुमारे अर्धा तास भेट घेतली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ही भेट झाल्याने तर्कवितर्क लढविण्यात आले. तथापि, ही भेट अन्नपूर्णा पाणी योजनेच्या कामाबाबत होती आणि भेट होताच उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या कामाचा निपटारा केल्याचे घाटगे यांच्याकडून सांगण्यात आले.घाटगे हे सध्या महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांचाही त्यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांच्या पुढाकाराने त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. कागलच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ आणि घाटगे एकत्र असल्याने त्यांच्या राजकारणाला बळ देण्याचा मंत्री मुश्रीफ यांचाही प्रयत्न आहे. त्यातूनच या भेटीमागे अन्य काही वेगळ्या घडामोडी तर आकार घेत नाहीत ना, अशी शंका उपस्थित झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे संजय घाटगे यांनी घेतली अजित पवार यांची भेट, कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 1:35 PM