दीपक मेटील ल्ल सडोली (खालसा)भोगावती कारखान्याच्या निवडणुकीत सडोली खालसा गटातून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील सडोलीकर हे स्वत: उत्पादक गटातून तर कै. दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांचे बंधू अशोकराव पवार पाटील हे निवडणूक लढवत असल्यामुळे दोन्ही माजी आमदारांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.सडोली खालसा गट हा सडोली व परिते जिल्हा परिषद मतदारसंघात विखुरला आहे. प्रथमच कारखान्याची निवडणूक गट पद्धतीने होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा गट असूनसुद्धा मागील निवडणुकीत कॉग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये फक्त काँग्रेस पक्षातून करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य कै. आनंदराव मेडसिंगे यांनी निवडणुकीत शेवटपर्यंत झुंज दिली होती. यावेळी काँग्रेस पक्षातून आनंदराव मेडसिंगे यांच्या पत्नी जयश्री मेडसिंगे यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु युवा नेतृत्व असलेल्या दत्तात्रय मेडसिंगे यांना उमेदवारी देण्यासाठी स्वत: मेडसिंगे आग्रही राहिल्याने भोगावतीचे माजी संचालक बी. ए. पाटील यांची उमेदवारी थांबवून त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांना देऊन आदलाबदली केली होती. यामुळे बी.ए. पाटील हे थोडे नाराज असले तरी त्यांची नाराजी दूर करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. परिते जिल्हा परिषद मतदार उमेदवारी जाहीर झालेले कुर्डूचे सरपंच यांनी पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना आपली उमेदवारी देऊन मन मोठे केले. परतु संदीप पाटील यांचे राजकीय पुनर्वसन भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत करू, असा शब्द पी. एन. यांनी दिला होता. परंतु याही निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाराज असलेले संदीप पाटील गटाचे कार्यकर्ते आक्रमक पवित्र्यात होते. परंतु गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे दत्तात्रय मुळीक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी चांगलीच कंबर कसावी लागली. यावेळी स्वत: निवडणूक रिंगणात पी. एन. पाटील उतरले आहेत. यावेळी काँग्रेसमधून दत्तात्रय मेडसिंगे यांना उमेदवारी, तर बी. ए. पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे, तर देवाळेचे प्रा. शिवाजी पाटील यांना ‘ब’ गटातून संधी दिली आहे. आघाडीतून माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांचे बंधू अशोकराव पवार-पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे, तर अशोकभाऊंचा विश्वास असलेले आरे गावचे माजी संचालक विश्वास वरूटे यांना विश्राती देऊन राष्ट्रवादीमधून ‘ब’ वर्ग गटातून रमेश पाटील यांना संधी दिली आहे, तर आघाडीतून सुरेश चौगले, तर भटक्या विमूक्त जातीमधून बाबूराव हजारे यांना लॉटरी लागली आहे. परिवर्तन विकास आघाडीतून सदाशिव चरापले यांचे विश्वासू कार्यकर्ते असलेले रघुनाथ चव्हाण कांडगाव व हिंदूराव हजारे यांना संधी दिली आहे.अशी होणार लढतीकॉग्रेस : पी. एन. पाटील, दताञय मेडसिंगे, अनिता भिमराव पाटील, शिवाजी पाटील. शाहू आघाडी : अशोकराव पवार- पाटील सुरेश चौगले, रमेश पाटील, बाबुराव हजारे. परिवर्तन आघाडी : रघुनाथ चव्हाण, हिदुराव हजारे
सडोलीत माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: April 18, 2017 1:03 AM