लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प फुटल्यानंतर झालेल्या नुकसानीची माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाशी संवाद साधत त्यांना आधार दिला.
माजी खासदार महाडिक यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने भरीव मदत द्यावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मदत जाहीर करावी. स्वतः आपण शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. मेघोली प्रकल्प नुकसानग्रस्ताना व्यक्तिगत स्वरूपातील जाहीर मदतीमध्ये ज्यांची जनावरे मृत झाली आहेत. त्यांना रोख एक लाख रुपयाची मदत व ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यांना बांधकामाचा खर्च देऊन मदत देणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, नाथाजी पाटील, देवराज बारदेस्कर, भाजपा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष पार्थ सावंत, युवाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, तुकाराम देसाई, पंढरीनाथ महाडिक, प्रवीण आरडे, शशिकांत पाटील, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ०४ मेघोली महाडिक