शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Kolhapur: मंडलिक गटाच्या भूमिकेवर मुश्रीफ-राजे गटाचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:12 PM

मंडलिक गटाला काय साध्य करायचे आहे..

कागल : कागल-गडहिंग्लज मतदारसंघातून माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र आणि मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना लक्ष्य करत टीका केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थकांनी गावोगावी एका रात्रीत मुश्रीफ आणि घाटगेंवर टीका असलेला एकाच आशयाचा मजकूर असलेले डिजिटल फलक उभारल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबद्दल मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे गटाने सावध पवित्रा घेतला आहे. कोणतेही भाष्य केलेले नाही.‘हसनसाहेब, समरजितराजे, काय काय केलाय तुम्ही - हे विसरणार नाही आम्ही’ कट्टर मंडलिक समर्थक - कागल विधानसभा - २०२४ असा मजकूर या फलकावर आहे. गावातील प्रमुख चौकात ते उभारले आहेत. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी संजय मंडलिक यांची फसवणूक केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मंडलिक गटाच्या या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच इतके डिजिटल फलक अचानक उभे केले, याचा अर्थ पूर्वतयारी करून वीरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे.मंडलिक गटाला काय साध्य करायचे आहे..वीरेंद्र मंडलिक यांच्या भूमिकेचे पडसाद मतदारसंघात उमटले आहेत. त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार? अशी भूमिका घेण्यामागे मंडलिक गटाचा हेतू काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून प्रचारही करत असलेले मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे सदाशिवराव मंडलिक यांचे छायाचित्र वापरत आहेत. त्यावरही मंडलिक गटाने हरकत घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेsanjay mandlikसंजय मंडलिक