धर्मसंकटातील 'के. पी. पाटीलां'ना काँग्रेस पाठबळ देणे शक्य, शरद पवारांसोबतच राहण्याचा दिला सल्ला
By राजाराम लोंढे | Published: July 5, 2023 01:53 PM2023-07-05T13:53:03+5:302023-07-05T13:53:28+5:30
माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांच्यादृष्टीने ‘बिद्री’ कारखाना व आमदारकी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी तेथील राजकीय त्रांगडे पाहता कोणती भूमिका घ्यावी, अशी संभ्रमावस्था आहे. आगामी ‘लोकसभे’चे गणित सोपे करण्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहावे, असा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. त्या बदल्यात त्यांना विधानसभेला मदत करण्याची भूमिकाही काँग्रेसने घेतल्याचे समजते.
गेली अनेक वर्षे ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या माध्यमातून के. पी. पाटील यांचे कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत चांगले नेटवर्क आहे. कारखानाही चांगल्या प्रकारे चालवल्याने त्यांच्याबाबत कार्यक्षेत्रात सहानुभूती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘के. पी.’च्या भूमिका वेगळे महत्त्व आहे. गेली ४० वर्षे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाेबत आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ते काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.
सोमवारी त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतल्याने ते त्यांच्यासोबतच राहणार असे वाटते; पण त्यांच्यासमोर ‘राधानगरी’च्या राजकारणाचे त्रांगडे आहे. विधानसभेसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत जावे तर ‘बिद्री’ कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची मंजुरी, चौकशी आणि कारखाना निवडणूक या सगळ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. ही भीती त्यांच्या मनात दिसते. पाटील यांच्यासमोर असे धर्मसंकट उभे असताना, काँग्रेसच्या पातळीवरून लोकसभेचे गणित पाहून त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
मुश्रीफ यांची समजूत काढून तिथेच थांबू या
आगामी विधानसभेसह एकूणच भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील राजकारणातील त्रांगडे पाहता, ‘बिद्री’ कारखान्यापुरते मंत्री हसन मुश्रीफ यांची समजूत काढा आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याची परवानगी घ्यावी, असा एक मतप्रवाह पाटील यांच्या गटाचा आहे.
‘के. पी.’ शरद पवार यांच्यासोबत राहण्यात काँग्रेसचा हा स्वार्थ
महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस हाच ताकदवान पक्ष राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ची जागा काँग्रेसला मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसची ताकद कोल्हापूर शहर, करवीर व राधानगरी तालुक्यांत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगडमध्ये फारसे अस्तित्व नाही. अशा परिस्थितीत लोकसभेची जागा खेचून आणायची म्हटले तर या तालुक्यातील एखादा नेता सोबत असण्याची गरज आहे. दोन-तीन तालुक्यांत प्रभाव असणारे के. पी. पाटील हे सोबत असणे काँग्रेसला फायद्याचे आहे.
विधानसभेला ‘के. पीं’ना असे मिळू शकते बळ
आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (काही गट)