कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका शोभादेवी दीपकराव शिंदे-नेसरीकर (वय ७१) यांचे सोमवारी (दि. १०) बंगळूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा यशोधन, सून व नातवंडे असा परिवार आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर बंगळूरमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
जिल्हा शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबा नेसरीकर यांच्या त्या स्नुषा, तर दिवंगत कॅप्टन दीपकराव शिंदे यांच्या त्या पत्नी होत. नेसरी पंचक्रोशीत त्या 'शोभाआक्का' या नावानेच परिचित होत्या.
नव्वदच्या दशकात आक्रमक व धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून जिल्हाभर त्यांची ओळख होती. १९९२ ते १९९७ दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेत नेसरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या त्या पहिल्या महिला स्वीकृत संचालिका होत. गेली १५ वर्षे त्या जिल्हा संघाच्या संचालिका म्हणून कार्यरत होत्या.
गेल्या ३० वर्षांपासून नेसरी विकास सेवा संस्थेची सत्ता त्यांच्या गटाकडेच आहे. कॅप्टन शिंदे यांच्या नावाने त्यांनी गावात पतसंस्थाही स्थापन केली आहे.
-
शोभादेवी शिंदे-नेसरीकर : १००५२०२१-गड-०४
(टीप : कोल्हापुरात शोकसभा जोड बातमी वापरावी)