शहरं
Join us  
Trending Stories
1
'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?
2
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
3
शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर
4
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
5
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
6
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
7
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
8
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
9
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
10
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
11
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
12
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
13
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
14
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
15
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
16
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
17
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
18
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
19
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
20
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; उल्हास पाटील, सुजित मिणचेकर ‘स्वाभिमानी’त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:22 PM

शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय भूकंप 

जयसिंगपूर : उद्धवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील व सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिरोळ येथे सोमवारी रात्री माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत घेतला. दोघेही उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.दहा वर्षांनंतर माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील एकत्र दिसणार आहेत. महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्यानंतर तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे.महाविकास आघाडीतून शिरोळची जागा काँग्रेसला गेल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार माजी आमदार उल्हास पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. सोमवारी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीतून पाटील यांची बंडखोरी होणार, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी हातकणंगले मतदारसंघातील सुजित मिणचेकर, तर शिरोळचे उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीत प्रवेश करून निवडणूक लढवावी, यावर चर्चा झाली. या प्रस्तावावर रात्री उशिरा पाटील यांच्या निवासस्थानी देखील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला. या निर्णयामुळे कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना असा प्रचार आता तालुक्यात सुरू होणार आहे. एकूणच विधानसभेच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे. दोन माजी आमदारांनी उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ठाकरे यांना कोल्हापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मिणचेकर व उल्हास पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirol-acशिरोळhatkanangle-acहातकणंगलेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे