कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व न्यू काॅलेज, कोल्हापूर यांच्या वतीने सोमवारपासून ४० व्या युवा महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. हा शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील ४५० हून अधिक विद्यार्थी तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात १९ कला प्रकार सादर करणार आहेत.
या युवा महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्यासोबत प्र-कुलगुरू डाॅ. पी.एस. पाटील व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डाॅ. आर.व्ही. गुरव हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के.जी. पाटील असणार आहेत. या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या युवा महोत्सवात वक्तृत्व, गायन, वादन, रांगोळी, पोस्टर, नकला आदी १९ कला प्रकार विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइल, लॅपटाॅपद्वारे सादर करता येणार आहेत. अशी माहिती न्यू काॅलेजचे प्राचार्य डाॅ. व्ही.एम. पाटील यांनी दिली.