शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

पॅकर्स स्पोर्टसह फौंडेशनची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:22 AM

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या टी-२० क गट क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पॅकर्स क्रिकेट क्लब व पॅकर्स स्पोटर्स ...

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या टी-२० क गट क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पॅकर्स क्रिकेट क्लब व पॅकर्स स्पोटर्स फौंडेशनने प्रतिस्पर्धी संघावर मात करीत पुढील फेरी गाठली.

राजाराम काॅलेज मैदानावर शनिवारी पहिल्या सामन्यात पॅकर्स क्रिकेट क्लबने गोकुळ दूध संघाचा ८८ धावांनी पराभव केला. यात प्रथम फलंदाजी करताना पॅकर्स क्लबकडून अनिमेश राॅयने ८४ व एकलव्य खाडेने ४० धावा करीत संघाची धावसंख्या १७१ नेली. गोलंदाजी करताना गोकुळकडून अनिल पाटीलने दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना गोकुळ संघास हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १४.१ षटकांत ८३ धावांत गुंडाळला. पॅकर्स क्लबकडून जुनेद मलबारी , कार्तिक पाटील यांनी भेदक गोलंदाजी करीत प्रत्येकी दोन बळी घेतले.

दुसऱ्या सामन्यात पॅकर्स स्पोर्टस फौंडेशनने बबन पाटील ॲकॅडमीचा ८२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पॅकर्स फौंडेशनने २० षटकांत ९ बाद १५५ धावा केल्या. यात शुभम मोहरकरने ४९, पृथ्वीराज उन्हाळकरने १९, संतोष राजगोळकरने १७ , आयुष सक्सेना याने नाबाद १४ धावा केल्या. गोलंदाजी करताना पाटील ॲकॅडमीकडून ऋत्विक वाझे याने तीन, आशिष पुजारी व विनोद कोळी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना पाटील ॲकॅडमीला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १३.४ षटकांत सर्वबाद ७३ गारद झाला. यात मानतेश मेकेरी याने २४ धावा केल्या.