कोल्हापूर : टेंबलाई नाका झोपडपट्टी येथे किरकोळ वादातून दाम्पत्यास चौघांनी बेदम मारहाण केली. अकिल उमर शेख (वय ३५) व त्यांची पत्नी अशी जखमींची नावे आहेत.
राजारामपूरी पोलीसांनी संशयित हौसा कसबेकर, सारीका दत्तात्रय कसबेकर, उमा कसबेकर व सारीकाचा भाऊ यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली.
अधिक माहिती अशी, अकिल व हौसा कसबेकर हे एकमेकांचे शेजारी राहण्यास आहेत. गेल्या सहा महिन्यापासून त्यांचेत किरकोळ वादावादी आहे. दि. १६ रोजी शेख यांची मुले कसबेकर यांच्या दारात खेळत होती.
यावेळी हौसा कसबेकर यांनी शेख यांच्या पत्नीस शिवीगाळ करु नका असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली. पत्नीला सोडविण्यास शेख गेले असता त्यांच्या डोक्यात फरशी मारुन जखमी केले.
त्यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.