कोल्हापूर, दि. २ : उदगाव (ता. शिरोळ) येथील दरोड्यातील पलायन केलेल्या आरोपीचा चार पथकाद्वारे शोध सुरु आहे.सीपीआर रुग्णालयात बंदोबस्तास असणाºया पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीने पलायन केल्याचे स्पष्ट झाल्याने सहायक फौजदार दिनकर कवाळे, कॉन्स्टेबल सचिन वायदंडे आणि होमगार्ड ए. एस. सूर्यवंशी या तिघांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. गांधी जयंतीनिमित्त प्रशासनास सुट्टी असल्याने हा निर्णय एकदिवस पुढे ढकलण्यात आल्याचेही मोहिते यांनी सांगितले.संशयित आरोपी विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (२३, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याने आजाराचा बहाणा करीत सीपीआर रुग्णालयातून रविवारी पहाटे चारच्या सुमारास हातातील बेड्या काढून पलायन केले. सर्वत्र नाकाबंदी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु सापडला नाही.गंभीर गुन्ह्यांतील आरोपीच्या पलायनामुळे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी बंदोबस्तास असणाºया पोलिसांची चांगलीच खरपडपट्टी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने खूप मेहनत घेतली होती. असे असतानाही जयसिंगपूर पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे आरोपीला पळून जाण्याची संधी मिळाली.आरोपींचे नातेवाईक कर्जत, श्रीगोंदा (अहमदनगर), करमाळा (सोलापूर), इंदापूर (पुणे) या भागांत सक्रिय आहेत. त्यामुळे पवार या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता ओळखून जयसिंगपूर पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यांना सावध केले आहे. येथील नातेवाइकांच्या घरासह तासगाव, वाळवा, मिरज, आदी ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही.
पळून गेलेल्या आरोपीचा चार पथकांद्वारे शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:03 PM
उदगाव (ता. शिरोळ) येथील दरोड्यातील पलायन केलेल्या आरोपीचा चार पथकाद्वारे शोध सुरु आहे.सीपीआर रुग्णालयात बंदोबस्तास असणाºया पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीने पलायन केल्याचे स्पष्ट झाल्याने सहायक फौजदार दिनकर कवाळे, कॉन्स्टेबल सचिन वायदंडे आणि होमगार्ड ए. एस. सूर्यवंशी या तिघांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.
ठळक मुद्देसहायक फौजदारासह तिघांवर निलंबनाची कारवाई करणार : संजय मोहितेगांधी जयंतीनिमित्त प्रशासनास सुट्टी असल्याने निर्णय एकदिवस पुढे बंदोबस्तास असणाºया पोलिसांची पोलिस अधीक्षक मोहिते यांनी काढली खरपडपट्टी