शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

कोल्हापुरातील व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून लूटणाऱ्या चौघांना अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:44 PM

पैसे जमा करण्यासाठी येणाराच लुटीचा सूत्रधार : पाचगावातील बारमध्ये बसून रचला कट

कोल्हापूर : साईक्स एक्स्टेंशन येथील गजलता आर्केडमधील व्यावसायिकाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यास पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत १३ लाख २९ हजार ४०० रुपयांची लूट करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. १९) रात्री चौघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ११ लाख ३५ हजार रुपयांची रोकड, एक कार, एक पिकअप टेम्पो, मोपेड, तीन मोबाइल, पिस्तूल, चाकू असा सुमारे ३२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.अभिषेक विजय कागले (वय ३१, रा. युवराज कॉलनी, पाचगाव), आशिष नीळकंठ कागले (३७, रा. ऋषिकेश कॉलनी, पाचगाव), बाळकृष्ण श्रीकांत जाधव (३५, रा. पाचगाव) आणि अमरजित अशोक लाड (४१, रा. लाइन बाजार, कसबा बावडा) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १७) दुपारी सव्वादोन ते अडीचच्या दरम्यान झालेल्या लूटमारीचा तपास शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आठ पथकांनी केला. गुन्ह्यात वापरलेल्या मोपेडचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित मार्केट यार्ड येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ गेल्याचे दिसले. त्याठिकाणी मोपेड एका पिकअपमध्ये ठेवून ते कारमधून पुढे गोव्याला गेले. वाहनांच्या नंबरवरून संशयितांची माहिती मिळताच पथकांनी शोध गतिमान केला. गोव्याहून नुकतेच परत आलेले संशयित सोमवारी रात्री पाचगाव आणि कसबा बावडा येथे पोलिसांच्या हाती लागले.

पैसे जमा करणारा लाड सूत्रधारशिरोली पुलाची येथील एका दुकानात काम करणारा अमरजीत लाड हा नेहमी गजलता आर्केड येथील कार्यालयात पैसे जमा करण्यासाठी जात होता. शनिवारी दुपारी ४ लाख २९ हजार ४०० रुपयांची रक्कम तो कार्यालयात जमा करून बाहेर पडला. मोठी रक्कम जमा झाल्याची खात्री पटताच त्याने कागले बंधू आणि जाधव या मित्रांना फोन करून लूट करण्यास सांगितले.

बारमध्ये बसून रचला कटपाचगाव येथील राजयोग बारमध्ये शुक्रवारी दुपारी कागले बंधू आणि जाधव हे तिघे दारू पित बसले होते. त्याचवेळी त्यांनी लाड याच्या सांगण्यावरून लूटमारीचा कट रचला. त्यानंतर उद्यमनगर येथून पाच हजार रुपयांचे एअर पिस्टल आणि १०० रुपयांचा चाकू, कापडी मास्क, चिकटटेप खरेदी केला. अभिषेक कागले याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्याचा चुलत भाऊ आशिष हा दुकानात मदत करतो.गोव्यात उडवले दीड लाखलूटमार करताच चौघे कारने थेट गोव्यात पोहोचले. दोन दिवसांत त्यांनी कॅसिनोमध्ये दीड लाख रुपये उडवले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. कोल्हापुरात पोहोचताच ते पोलिसांच्या हाती लागले.

कर्जफेडीसाठी कटलूटमारीचा कट रचणारा लाड हा बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानात काम करतो. त्याच्यावर चार लाखांचे कर्ज आहे. कर्जफेडीसाठी आणि मौजमजा करण्यासाठी लूटमारीचा कट रचल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले. व्यावसायिक ललित बन्सल यांच्या कार्यालयात मोठी रक्कम जमा होते. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. भीतीपोटी मालक पोलिसांत फिर्याद देणार नाही, असा चोरट्यांचा समज होता.यांनी लावला छडापोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि उपअधीक्षक अजित टिके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, शाहूपुरीचे निरीक्षक अजय सिंदकर, सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे यांच्यासह सहायक फौजदार संदीप जाधव, अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, विजय इंगळे, अमित सर्जे, रोहित मर्दाने, आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस