गौरव सांगावकर
राधानगरी - शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. आज पहाटे 5 वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला तर सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी दरवाजा क्रमांका ५ उघडला, सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी क्रमांक ३ व चार असे ऐकून चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून विद्युत गृहातून १५०० क्युसेक विसर्ग असा ऐकून ७२१२ क्युसेक विसर्ग सद्या भोगावती नदी पात्रात सुरू आहे. आज सकाळी सहापर्यंत ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या वर्षी २५ जुलैला धरणाचे दरवाजे उघडले होते. तर ८ ऑगस्टला सर्व दरवाजे बंद झाले होते. त्यानंतर आज १७ दिवसांनी पुन्हा दरवाजे उघडले आहेत. ऑगस्टमधील दहा ते बारा दिवस कडक ऊन पडल्याने राधानगरी पश्चिम भागातील भात पीक धोक्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने भात पिकाला दिलासा मिळाला असला तरी या मुसळधार पावसाने नदी काटची भात पिके पुन्हा अडचणीत येणार आहेत.