शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेद्वारे चार कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 2:51 PM

कोल्हापूरातील युवकांनी ‘नो शेव्ह नोव्हबर’ या उपक्रमा अंतर्गत महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कमेतून बुधवारी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापुर प्रेस क्लब कार्यालय येथे किरण गीते यांच्या हस्ते ही रक्कम नातेवाईकांना देण्यात आली.

ठळक मुद्देनो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेद्वारे चार कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत

कोल्हापूर : कोल्हापूरातील युवकांनी ‘नो शेव्ह नोव्हबर’ या उपक्रमा अंतर्गत महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कमेतून बुधवारी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापुर प्रेस क्लब कार्यालय येथे किरण गीते यांच्या हस्ते ही रक्कम नातेवाईकांना देण्यात आली.जगभरात नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम सुरू असते याचेच अनुकरण कोल्हापुरातील दर्शन शहा आणि शेखर पाटील यांनी गेल्या वर्षी पासून सुरू केली. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला कोल्हापुरातील दोनशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला. याअंतर्गत महिनाभर दाढी केली गेली नाही. दाढी करण्यासाठी जेवढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली होती.कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार यंदा सलग दुसर्या वर्षी ही मोहीम अगदी उत्साहाने राबविण्यात आली.विशेष म्हणजे यावर्षी परभणीमधील किरण गीते या युवतीच्या हस्ते जमा झालेली रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. किरण गीते या युवतीने काही दिवसांपूर्वीच स्वत:चे केस कन्सरग्रस्त महिलेसाठी दान केले आहेत. तिच्या कार्याची दखल घेऊन नो शेव्ह नोव्हेंबर ग्रुपकडून तिला निमंत्रित करण्यात आले होते.विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली असल्याने सोशल मीडियाचा असाही वापर करणारे तरुण समाजात आहेत, हे या उपक्रमाद्वारे दाखवून दिले आहे. तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे याचे खुप कौतुक वाटत असल्याच्या भावना काही कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सचिव मनजीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

४०० जणांचा सहभाग...यावर्षी ४०० हून अधिक तरुण मोहिमेत सक्रिय झालेत. ग्रुपच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक रक्कम सोशल मीडियाच्या माध्यमातून गोळा करण्यात आली. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना ही जमा देण्यात आली. 

 

टॅग्स :cancerकर्करोगkolhapurकोल्हापूर