कोल्हापूर : येथील गिर्यारोहक अमोल आळवेकर यांनी जीवधनजवळील वानरलिंगी, जुन्नूर नाणेघाट येथील खडा पारसी, माळशेज घाटातील माळशेज लिंगी, फंट्या, सांगनोरे हे चार सुळके एकाच मोहिमेत सर केले.
जीवधनजवळील वानरलिंगी व खडा पारसी या दोन सुळक्यांची उंची ३३० फूट आहे, तर माळशेज घाटातील माळशेज लिंगीची उंची १२० फूट, फंट्या सुळक्याची उंची १२५ फूट व सांगनोरे सुळक्याची उंची ७० फूट असे आळवेकर यांनी सर केलेल्या चार सुळक्यांचा समावेश आहे. यासाठी आळवेकर यांनी सिक्वेन्स क्लायबिंग या तत्रांचा वापर करून गाईडमन, मिडलमन आणि एन्डमन अशा आरोहणाची तांत्रिक पद्धत वापरली. मोहिमेमध्ये माऊंटेनिअरिंग रोप, राॅक पिटाॅन, कॅरबिनर, क्विक ड्राॅ, टेप सिलिंग, इंटीरिअर लॅडर, डायनामा, हॅमर, क्रॅक क्लायबिंग, ओव्हर हबँग अशा साधनांचा वापर करण्यात आला. आळवेकर हे कोल्हापुरातील संभाजीनगर एस. टी. डेपाेमध्ये वाहक म्हणून काम करतात. नोकरी सांभाळून हौस म्हणून गिर्यारोहणाचा छंद त्यांनी जोपासला आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. या मोहिमेत मंगेश कोयंडे, अरविंद नेवले यांनीही सहभाग घेतला.
फोटो : २६१२२०२०-कोल-अमोल आळवेकर
आेळी : कोल्हापुरातील गिर्यारोहक अमोल आळवेकर यांनी एकाच मोहिमेत वानरलिंगी, माळशेज लिंगी, फंट्या, खडा पारसी हे चार सुळके सर केले.