दरम्यान, नगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी लॉकडाऊन अंमलबजावणीत व्यस्त असल्याने शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.
गटारी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू साथ पसरत आहे. पालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे. नागरिक आजारापेक्षा उपचार खर्चालाच दचकून आजारापासून लांब राहण्यासाठी घरीच राहणे पसंत करीत आहेत. कडक लॉकडाऊन, पालिका प्रशासन, आरोग्य विभागाची सतर्कता यामुळे शहरातील रुग्णवाढीवर आळा घालण्यात यश येत असले तरी कोरोना कामामुळे पालिका प्रशासनाचे शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू साथ पसरत आहे.
शहरातील एका रुग्णालयात चारजणांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फोटो - २००५२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील मोमीन गल्लीत अशाप्रकारे गटार तुंबलेली आहे.