शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

तनिष्क ज्वेलर्स चोरीप्रकरणी चौघा परप्रांतीयांना अटक, तीन महिलांसह चौघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 10:34 AM

Crimenews Kolhapur pune- दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला. शाहूपुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून चौघा परप्रांतीयांना अटक केली. त्यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूरसह पुण्यातील आणखी दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिन्हीही चोरीतील १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच वापरलेली मोटार असा सुमारे ११ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देतनिष्क ज्वेलर्स चोरीप्रकरणी चौघा परप्रांतीयांना अटक, तीन महिलांसह चौघांचा समावेशपुण्यातीलही दोन तनिष्क मधील चोऱ्यांचा उलगडा; मोटारीसह १०७ ग्रॅम सोने जप्त

कोल्हापूर : दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला. शाहूपुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून चौघा परप्रांतीयांना अटक केली. त्यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूरसह पुण्यातील आणखी दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिन्हीही चोरीतील १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच वापरलेली मोटार असा सुमारे ११ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अटक केलेल्यांची नावे : एजाज रियाझ खान (वय ३३, रा. पोस्ट ऑफिस रोड, जि. चिकलपालअबुल रा. कर्नाटक. सध्या रा. बेंगलोर), संजू रवींद्र गुप्ता (३५, रा. बरी तहसिल, जि. कानपूर, उत्तर प्रदेश), सरिता राजाराम शर्मा (२५), आयुषी गुलाब शर्मा (२५, दोघीही रा. रा. रॉबर्टगंज, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश. सध्या रा. बोरीवली वेस्ट, मुंबई).मंगळवारी दुपारी रिक्षातून आलेल्या तीन महिला ग्राहकांनी कोल्हापुरात दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स दुकानात जाऊन सोने खरेदीच्या बहाण्याने सेल्समनची नजर चुकतून ३७ ग्रॅम ७०० मि.लि. वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या होत्या.ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून संशयित कोठे रिक्षात बसले, कोठे उतरले याची माहिती मिळवली. पोलिसांनी मध्यरात्रीच शाहूपुरी, बेकर गल्लीतील हॉटेलवर छापा टाकला. त्यात तीन महिलांसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पर्समध्ये चोरीच्या सुमारे १०५ ग्रॅमच्या सोन्याच्या सहा बांगड्या मिळाल्या, गुन्ह्यात वापरलेली मोटारही पोलिसांनी जप्त केली.पुण्यातील दोन तनिष्क ज्वेसर्लमध्येही चोरीसंशयितांनी कोल्हापुरात येण्यापूर्वी पुण्यातील तसेच पुणे-नगर रोडवरील अशा दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही मंगळवारी सकाळीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संशयित शिर्डी येथेही गेले, पण तेथून चोरीची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.तपासाचे शिलेदारस्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो. नि. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. सत्यराज घुले, पोलीस चंदू नन्नवरे, सचिन गुरखे, नितीन चैथे, वसंत पिंगळे, सोमराम पाटील, रवींद्र पाटील, संजय पडवळ, वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjewelleryदागिनेPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरPuneपुणे