राधानगरी : राधानगरी धरण रविवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे चार वाजता दोन व सायंकाळी आणखी दोन असे चार दरवाजे उघडले असून, त्यातून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे ओसरत असलेल्या महापुराची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणातील पाण्याची पातळी ३४७.५ फूट झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता धरणाचे सहा व तीन क्रमांकाचे दरवाजे उघडले. यानंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे ६.३७ मिनिटांनी चार नंबरचा व ६.५५ मिनिटांनी पाच नंबरचा असे आणखी दोन दरवाजे उघडले. गतवर्षी ६ ऑगस्ट रोजी हे धरण पूर्ण भरले होते.
फोटो ओळ- राधानगरी धरण रविवारी पूर्ण भरले. धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.