शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

उदगावजवळ चार ठार

By admin | Published: September 15, 2015 1:34 AM

मुंबईचे दोघे जखमी : झायलो कार-दूध टॅँकरची समोरासमोर जोरदार धडक

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील बस स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री झालेल्या दूध टँकर व झायलो गाडीच्या अपघातात झायलो कारमधील चौघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये झायलो गाडीचा चक्काचूर झाला. घटनेनंतर टॅँकरचालक फरार झाला. शिवराज बाजीराव पाटील (वय ३०) कपिल विजय पाटील (२८), प्रवीण प्रकाश मोहिते (३५, सर्व रा. कर्नाळ, ता. मिरज जि.सांगली) व अनंतकुमार शांतीनाथ खोत (३५, रा. नांद्रे) अशी मृतांची नावे आहेत, तर संतोष गणू दैत्य (३०, रा. भांडूप मुंबई) व सचिन सोमा जामखंडेकर (३०, रा. तांबेनगर मुलुंड (वेस्ट), मुंबई) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री दीडच्या सुमारास झायलो गाडी (एम एच ०५ ए एम ८७४१) जयसिंगपूरहून नांद्रेकडे, तर शिवपार्वती रोडलाइन्स चिकुर्डेचा दूध वाहतूक करणारा टॅँकर (एम एच १० बी आर १०१०) हा सांगलीहून जयसिंगपूरकडे येत होता. उदगाव येथील बस स्थानक चौकात दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये झायलो गाडीमधील सहाजणांपैकी चालक अनंतकुमार खोत (रा. नांद्रे) याच्यासह शिवराज पाटील, कपिल पाटील, प्रवीण मोहिते (रा. कर्नाळ, ता. मिरज) हे चौघेजण जागीच ठार झाले. तर संतोष दैत्य, सचिन जामखंडेकर हे दोघे जखमी झाले आहेत. यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. झायलो गाडीचे चाक पंक्चर झाल्याने गाडी पलटी होऊन समोरून येणाऱ्या दुधाच्या टॅँकरला धडकली, अशी घटनास्थळावर चर्चा होती. रात्री दीडच्या सुमारास अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. तर दोघांना खासगी दवाखान्यात हलविले. पहाटे अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातही नातेवाइकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची वर्दी जहॉँगीर गुलाब मुजावर यांनी येथील पोलिसांत दिली आहे. घरी परतताना अपघात अपघातातील मृत व जखमी नांद्रे येथे राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे कार्यक्रमासाठी आले होते. रात्री गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातस्थळी राष्ट्रवादी पक्षाचे स्कार्प, शाल, श्रीफळ असे साहित्य पडले होते. नांद्रे, कर्नाळमध्ये शोककळा; गाव बंद; मृतांवर अंत्यसंस्कार नांद्रे : उदगाव (ता. शिरोळ) येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याचे समजताच नांद्रे व कर्नाळ (ता. मिरज) गावांवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून मृतांना आदरांजली वाहिली. मृतांवर नांद्रे व कर्नाळमध्ये सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री ट्रक आणि झायलो मोटार यांची धडक होऊन शिवराज पाटील, कपिल पाटील, प्रवीण मोहिते (तिघे रा. कर्नाळ) व अनंतकुमार खोत (नांद्रे) ठार झाले होते, तर त्यांचे मित्र संतोष दैत्य व सचिन जामखंडेकर (मुंबई) गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच मृतांचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. शवविच्छेदन तपासणीनंतर मृतदेह सोमवारी सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. गाडीचा चक्काचूर अपघातानंतर झायलो गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. दरवाजे तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागला. जयसिंगपूर येथील शीतल गतारे, राजेंद्र आडके, नांदणीचे राजू कुरडे यांच्यासह इतर तरुणांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दोघे बचावले झायलो गाडीमध्ये सहाजण प्रवास करीत होते. चालकाबरोबरच पुढे बसलेला एकजण व मध्यभागी बसलेले दोघेजण जागीच ठार झाले, तर शेवटच्या सीटवर बसलेले दोघेजण बचावले. (वार्ताहर)