शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:37 PM

मोबाइलवरून चालते अवैध धंद्यांचे रॅकेट, पुण्यातील पथकाकडून कारागृहाची झडती

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैद्यांकडील मोबाइलचा शोध घेण्यासाठी पुणे येथील कारागृह पोलिस मुख्यालयातील पथकाने आणि कळंबा कारागृहातील सुरक्षारक्षकांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस शोधमोहीम राबवली. या कारवाईत मोक्कातील कैद्यांकडे चार मोबाइल मिळाले. याबाबत तीन कैद्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अजय भानुदास कुलकर्णी, विद्यासागर उर्फ राजेश नामदेव चव्हाण आणि जमीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.कळंबा कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैदी मोबाइल लपवून आत प्रवेश करतात. काही वेळा कारागृहाच्या भिंतींवरून मोबाइल आत फेकले जातात. कैद्यांकडून मोबाइलचा वापर वाढला असून, कारागृहात बसून सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही गुन्हे घडविल्याचेही समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कारागृह पोलिस मुख्यालयातील पथकाने शनिवारी रात्री कळंबा कारागृहाची झडती घेतली.यावेळी सर्कल क्रमांक पाचमधील बरॅक क्रमांक तीनच्या शौचालयात तीन मोबाइल सापडले. मोक्कातील कैदी अजय कुलकर्णी, विद्यासागर चव्हाण आणि जमीर शेख यांनी मोबाइल लपवून ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याबाबत कारागृह रक्षक भारत उत्तरेश्वर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तिघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत तुरुंग अधिकारी मोरे यांनी फिर्याद दिली.हिस्ट्री डिलीटकारागृहात कैद्यांकडून साधे मोबाइल वापरले जातात. फोन केल्यानंतर मोबाइल लपविताना त्यातील कॉल हिस्ट्री डिलीट केली जाते. त्यामुळे कोणाला फोन लावला, याचे पुरावे मिळत नाहीत. बहुतांश मोबाइलमध्ये सिम कार्डही नसते.

मोबाइल आत जातातच कसे?कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त असतो. कैदी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आत सोडले जाते. कारागृहाच्या भिंतींवरील मनोऱ्यांवरही सुरक्षारक्षक तैनात असतात. असे असतानाही मोबाइल कारागृहात जातातच कसे, असा सवाल जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

मोबाइलवरून चालते अवैध धंद्यांचे रॅकेटमोक्कासह अनेक गंभीर गुन्ह्यांतील कैदी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कारागृहात बसून ते मोबाइलद्वारे अवैध धंदे चालवितात. सांगली आणि पुण्यात घडलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये संशयितांना कळंबा कारागृहातील कैद्यांनी मोबाइलवरून सूचना दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगMobileमोबाइल