शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

आणखी चार पोलिसांचा सहभाग

By admin | Published: May 08, 2017 12:02 AM

वारणानगर चोरीप्रकरण : फिर्यादीत नावेच नाहीत, ‘देव’ पावल्याचा साक्षात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथून सव्वानऊ कोटींच्या रकमेवर डल्ला मारल्याच्या प्रकरणात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागातील आणखी चार पोलिसांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे; पण या चौघांची फिर्यादीत नावेच आली नसल्याने त्यांना ‘देव’ पावल्याचा साक्षात्कार झाला आहे. या चार पोलिसांविरुद्धही गुन्हा दाखल होणार का? राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभाग त्यादृष्टीने तपास करणार का? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मिरजेतील बेथेलहेमनगर येथे गतवर्षी एलसीबीने झोपडीवजा घरातून तीन कोटींची रोकड जप्त करून मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत ही रक्कम त्याने वारणानगर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीने तपासाच्या नावाखाली मैनुद्दीनला वारणानगरला नेले. त्यानंतर तिथे पुन्हा कोट्यवधीचे ‘घबाड’ सापडले. यातील दीड कोटीची रक्कम जप्त केली होती. पण त्याचवेळी सुमारे सव्वानऊ कोटीची रोकड एलसीबीच्या पथकाने हडप केल्याचे तब्बल एक वर्षानंतर उघडकीस आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, कुलदीप कांबळे, दीपक पाटील, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा तपास सीआयडी करीत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. यातील कुरळपकर, शंकर, दीपक व रवींद्र पाटील यांचे अटकपूर्व जामीन घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. बेथेलहेमनगरला पहिल्यांदा कारवाईनंतर याचा तपास करण्यासाठी ११ जणांची ‘टीम’ निवडली होती. ही ‘टीम’च पुढील तपासासाठी वारणानगरला गेली. मिळालेल्या रकमेचा प्रत्येकाने वाटा घेतला; पण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रत्यक्षात दोन अधिकारी व पाच कर्मचारी, अशा सातजणांविरुद्धच गुन्हा दाखल झाला.‘एलसीबी’ कोमातसव्वानऊ कोटींचे प्रकरण उघडकीस येऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. या प्रकरणामुळे सांगलीच्या ‘एलसीबी’ला धक्का बसला आहे. महिन्यापासून कोणतीही ठोस कामगिरी नाही. एरव्ही एक-दिवस आड कोणती-ना-कोणती कारवाई केलेली बातमी प्रसारमाध्यमांना दिली जायची; कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे दिली जायची. पण महिन्याभरात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. शरण येण्याच्या हालचालीकुरळपकर, शंकर, दीपक व रवींद्र पाटील यांचा कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे ते कोणत्याहीक्षणी सीआयडीला शरण जाण्याची शक्यता आहे. चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मिळणे कठीण आहे. तरीही त्यांनी प्रयत्न म्हणून अटकपूर्वसाठी अर्ज केला होता. घनवट, चंदनशिवे व शरद कुरळपकर यांनी अद्याप अटकपूर्वसाठी अर्ज केलेला नाही. पुरस्कार प्राप्तही लुटीच्या यादीत?ज्या चार पोलिसांची नावे फिर्यादीत आली नाहीत, ते राष्ट्रपतींचे पदक व पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळालेले पोलीस आहेत, अशी चर्चा सुरू आहे. यातील एक-दोघांनी तर गेल्या कित्येक वर्षांपासून एलसीबीतच तळ ठोकला आहे. अंगावर गणवेश परिधान केलेले त्यांना कधीच पाहायला मिळत नाही. महागड्या गाड्यांतून फिरणे, येईल त्या अधिकाऱ्याशी सलगी वाढवून त्यांच्या मर्जीत राहणे, हा त्यांचा उद्योग आहे.