कोल्हापूर : कोल्हापूर शहरात लॉकडाऊन असूनही बिंदू चौक परिसरातून रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत चार व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले.शहरात लॉमडाऊन आहे, तरीही काही नागरीक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळत आहेत. अशा नागरीकांची रॅपिड ॲन्टीजन चाचणी केली जात आहे. सोमवारी बिंदू चौकात ३५ नागरीकांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर चार नागरीकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.कोल्हापुरातील कोरोना साखळी तोडण्याकरिता या ॲन्टीजेन चाचणीचा उपयोग होत आहे. आतापर्यंत अशा चाचणीत आढळलेल्या व्यक्तींना आपण कोरोना बाधित आहोत याची साधी कल्पनाही नव्हती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना झाला. ॲन्टीजेन चाचणीमुळे अशा संसर्ग सरवणाऱ्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्यातही मदत झाली आहे.शहरात फिरत असलेल्या महानगरपालिकेच्या पथकाकडून अशी चाचणी करुन घेण्यास नागरीक घाबरतात, परंतु चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह असेल तर तातडीने उपचार घेता येतात, निगेटीव्ह असेल तर मनातील शंकाही दूर होते. संसर्ग रोखण्यात अशी चाचणी उपयोगी पडत आहे.
corona virus In Kolhapur : बिंदू चौकात चार व्यक्ती पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 7:30 PM
corona virus In Kolhapur : कोल्हापूर शहरात लॉकडाऊन असूनही बिंदू चौक परिसरातून रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत चार व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले.
ठळक मुद्देबिंदू चौकात चार व्यक्ती पॉझिटिव्ह महापालिका पथकाकडून ॲन्टीजेन चाचणी