शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस; शिरोळसह चार तालुक्यांनी ओलांडली जूनची सरासरी, ७ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 11:59 AM

पंचगंगेच्या पातळीत वाढ, भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर : गेली महिनाभर पावसाची उघडझाप सुरू असल्याने जून महिन्यातील सरासरीच्या ५५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. शिरोळसह चार तालुक्यांनी जूनची सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस हातकणंगले तालुक्यात १९१ मिलिमीटर झाला आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर भोगावती नदीपात्रातील पाणी प्रथमच पात्राबाहेर आले आहे. यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. जूनमध्ये जोरदार कोसळेल, असा अंदाज अगोदरच हवामान विभागाने वर्तविला होता. पण महिन्याभरात उघडझाप राहिली. जिल्ह्याची जूनची सरासरी ३६२ मिलिमीटर आहे. त्यापैकी १९९ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे. सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी केवळ २५ टक्केच पाऊस झाला होता.महिन्याभरात हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी व कागल तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात पाऊस चांगला झाला आहे. धरण क्षेत्रातही रोज पाऊस असल्याने पाणी साठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंचगंगा १७.७ फुटांवर आहे. ‘राजाराम’सह सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

राधानगरी सर्वांत मागेधरणाचा तालुका म्हणून राज्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यात गेल्या काही वर्षांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस होत आहे. जूनची सरासरी ६६४ मिलिमीटर होती, त्यापैकी केवळ २४९ मिलिमीटर ( ३७ टक्के) पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्गजिल्ह्यातील राधानगरी धरणात २.५४ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे ७ बंधारे पाण्याखाली आहेत.धरणांमधील पाणीसाठा राधानगरी २.५४ टीएमसी, तुळशी १.३३ टीएमसी, वारणा ११.८५ टीएमसी, दूधगंगा ४.५३ टीएमसी, कासारी ०.९२ टीएमसी, कडवी १.२८ टीएमसी, कुंभी ०.९२ टीएमसी, पाटगाव १.६१ टीएमसी, चिकोत्रा ०.५१ टीएमसी, चित्री ०.५६ टीएमसी, जंगमहट्टी ०.४९ टीएमसी, घटप्रभा १.४३ टीएमसी, जांबरे ०.५४ टीएमसी, आंबेआहोळ ०.८९ टीएमसी, सर्फनाला ०.०३ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.०८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.बंधाऱ्यांची पाणीपातळी  राजाराम १७.१० फूट, सुर्वे १९.५ फूट, रुई ४५ फूट, इचलकरंजी ४३.२ फूट, तेरवाड ३९.९ फूट, शिरोळ ३१ फूट, नृसिंहवाडी २४ फूट, राजापूर १३.६ फूट तर नजीकच्या सांगली ७.९ फूट व अंकली ८.१ फूट अशी आहे.

तालुकानिहाय जून महिन्यात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा तालुका - जूनची सरासरी - प्रत्यक्ष पाऊसहातकणंगले  - ११७   - १९१शिरोळ - १०३  - १०६पन्हाळा  - ३१० -  १५७            शाहूवाडी - ३५४  - ३६२राधानगरी  - ६६४  - २४९गगनबावडा - १०७० - ५५६करवीर - १८३  - ११९कागल  - १२७  -  १४०गडहिंग्लज - १८५ - १५८भुदरगड - ३३९  -  ३२५आजरा - ३९०  -  २१६चंदगड - ५६८  -  २५५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी