शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चार गावठी पिस्तुले जप्त-दोघा सराईत गुन्हेगारांना अटक : दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 6:47 PM

चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी फाटा बस स्टॉप पसिरात देशी बनावटीचे गावठी पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित विकी

ठळक मुद्देपिस्तुल तस्करी मनिष नागरगोजी हा सध्या कारागृहात आहे. तो या दोघांचा मास्टरमार्इंड आहे काय? याबाबतही चौकशी सुरु आहे.

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी फाटा बस स्टॉप पसिरात देशी बनावटीचे गावठी पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित विकी धोंडीबा नाईक (वय २८, रा. आमरोळी, ता. चंदगड), सुनिल भिकाजी घाटगे (२६, रा. दुसरा बसस्टॉप, लक्षतीर्थ वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चार पिस्तुले, १ मॅगझीन, ८ जिवंत राऊंड असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयितांकडे मिळालेली पिस्तुले कोठुन व कोणाकडून आणखी, बेकायदेशीर शस्त्र रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच संशयितांनी यापूर्वी कोणास शस्त्र विक्री केली आहे, याबाबत तपास सुरु असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आॅम अ‍ॅक्ट, अवैध दारु, जुगार, उघड्यावर दारु पिणे, हद्दपार, तडीपार, फरारी गुन्हेगार पकडणे आदी कारवाईसत्र सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडील पथके गस्त घालत असताना इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक रणजित पाटील यांना खबऱ्याकडून समजले की, बोंजुर्डी फाटा बसस्टॉप परिसरात दोन तरुण गावठी पिस्तुल व जिवंत राऊंड घेवून विक्रीसाठी येणार आहेत.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहकारी उपनिरीक्षक अमोल माळी, रणजित तिप्पे, सत्यराज घुले, महेश कोरे, वैभव दड्डीकर, शहनाज कनवाडे, विजय तळसकर, ज्ञानेश्वर बांगर, रविराज कोळी, राजु पट्टणकुडे, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, रणजित पाटील, अजिंक्य घाटगे, संग्राम पाटील, सचिन बेंडखळे यांना घेवून बोंजुर्डी परिसरात सापळा रचला. संशयित विकी नाईक व सुनिल घाटगे हातामध्ये बॅग घेवून आले असता झडप टाकून त्यांना ताब्यात घेतले. बॅगची झडती घेतली असता चार पिस्तुले, एक मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे मिळून आली. लोकसभा निवडणुक कालावधीत आजअखेर ८ बेकायदेशीर पिस्तुले आणि बंदूका जप्त केल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

कारागृहात झाली दोस्तीसंशयित विकी नाईक याचेवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर पिस्तुल बाळगलेप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे. संशयित सुनिल घाटगे याचेवर २०१३ मध्ये अनैतिक संबधातून लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. या दोघांची कळंबा कारागृहात भेट होवून मैत्री झाली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पिस्तुले तस्करीचा व्यवसाय करण्याचा प्लॅन आखला. त्यांनी बेळगाव येथून पिस्तुले आनलेची प्राथमिक माहिती आहे. पिस्तुल तस्करी मनिष नागरगोजी हा सध्या कारागृहात आहे. तो या दोघांचा मास्टरमार्इंड आहे काय? याबाबतही चौकशी सुरु आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे