इचलकरंजी : चंदूर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर गल्ली नं 10 मधील एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून खून केला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संबंधित चिमुकलीला दोघा अल्पवयीन मुलांनी खाऊचे अमिश दाखवून काल रविवारी सायंकाळी खांद्यावरून उचलून परिसरातील निर्जन स्थळी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिला तेथील गोरखनाथ कुंभार यांच्या विहिरीत टाकले.
त्यानंतर सायंकाळी मुलगी सापडत नसल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ही अल्पवयीन मुलेही त्यांच्या सोबत होती. पण काहीही माहिती दिली नाही. नंतर तिचा मृतदेह त्या विहिरीत आढळला. तेथून तो मृतदेह काढून नातेवाईकांनी लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, सोमवारी सकाळी हा प्रकार परिसरात समजल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, सरपंच संजय घोरपडे, यांनी भेट दिली.सीसीटीव्हीत कैदपरिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये अल्पवयीन मुलगा संबंधित पीडित मुलीला दुकानातून खाऊ घेऊन देऊन खांद्यावरून तिला घेऊन जातानाची घटना कैद झाली आहे.