शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

किरणोत्सवाचा चौथा दिवस : सुर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 7:09 PM

Mahalaxmi Temple Kolhapur, Religious Places कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या खांदयापर्यंत आली. या किरणांच्या प्रतिबिंबामुळे देवीचा चेहराही उजळून निघाला. गुरुवारी या वर्षातील किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी तरी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येतील अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देकिरणोत्सवाचा चौथा दिवस सुर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या खांदयापर्यंत आली. या किरणांच्या प्रतिबिंबामुळे देवीचा चेहराही उजळून निघाला. गुरुवारी या वर्षातील किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी तरी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येतील अशी अपेक्षा आहे.अंबाबाईच्या गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या किरणोत्सवांतर्गत चौथ्या दिवशी (बुधवारी) सूर्यकिरणांची तीव्रता अतिशय चांगली होती. त्यामुळे किरणे चेहऱ्यावर येवून किरणोत्सव पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र किरणे गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर अचानक ढग आल्याने तीव्रता एकदमच कमी झाली. ४ वाजून ५९ मिनिटांनी किरणे महाद्वार कमानीत आली. तेथून पुढे ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंतचा गाभाऱ्यापर्यंतचा प्रवास केल्यानंतर ५ वाजून ४४ व्या मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला.

५ वाजून ४८ व्या मिनिटांपर्यंत किरणे खांद्यापर्यंत पोहोचून लुप्त झाली. मात्र या किरणांचे प्रतिबिंब (वलय) देवीच्या चेहऱ्यावर पडल्याने अंबाबाईचे रुप या सोनेरी प्रकाशात उजळून निघाले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव राहूल जगताप आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे