कळे-पुनाळ मार्गावरील पुनाळ खिंडीत भवरीचा माळ आहे. या ठिकाणी मनोहर आनंदा शिंदे व विनायक दत्तात्रय शिंदे यांच्या मालकीचे सुमारे दहा एकर गवतपड क्षेत्र आहे. या क्षेत्रातून महावितरणच्या आसगाव ते पडळ सेक्शन ३३ के.व्ही.ची उच्च दाबाची वीज वाहिनी गेली आहे. सकाळी अकराच्या सुमारास विद्युत खांबावरून ठिणग्या पडल्या व माळातील गवताला आग लागली. दरम्यान, शिंदे कुटुंबीय शेजारी असलेल्या शेतीत सरी सोडण्याचे काम करत होते. झाडांचे डहाळे काढून त्यांनी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्याने इतर शेतकऱ्यांचे गवत वाचले. सुमारे अडीच एकरांतील दहा हजार गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी पडळ विभागाचे सहायक अभियंता सरदार चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, वारंवार अशा घटना घडून पंचनामा झाला; पण नुकसान भरपाई मात्र कधीच मिळाली नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पंचनाम्यास विरोध केला.
कळे येथील सलग चौथ्या वर्षी शॉर्ट सर्किटमुळे गवत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:49 AM