याबाबत माहिती अशी, बिद्री गावचे ग्रामस्थ अजित पाटील यांना चार दिवसांपूर्वी एक कोल्हा त्यांच्या शेतातील एका कोरड्या विहिरीत पडलेला दिसला. त्यावेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. चार दिवसांनंतर ते शेताकडे गेले असता त्यांना तो कोल्हा अजूनही विहिरीतच असल्याचे दिसले.
भूतदया म्हणून त्यांनी ही घटना सयाजी चौगले, प्रा. दिगंबर पाटील, महेश देसाई, अक्षय पाटील, सतेज पाटील यांना माहिती दिली. त्यांनी कोरड्या विहिरीत उतरून एका रिकाम्या बॅरेलच्या साहाय्याने कोल्ह्याला बॅरेलमध्ये पकडून विहिरीबाहेर आणले.
फोटोओळी
बिद्री (ता. कागल) येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला युवकांनी बॅरेलमध्ये पकडून विहिरीबाहेर आणले.