सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी यंदा चर्चमध्ये विविध सत्रांमध्ये प्रार्थना घेण्यात आली. कोरोनाच्या महामारीतून जगाला मुक्त करावे, या संकटाविरोधात लढणाऱ्या शासन, प्रशासनासह अन्य कोरोना योध्द्यांना बळ मिळावे, देशाची एकता, अखंडता कायम राहू दे, जगात शांतता नांदू दे, अशी प्रार्थना नाताळनिमित्त करण्यात आली.
- डी. बी. समुद्रे, रेव्हरंड
चौकट
वृध्द, लहान मुलांसाठी ऑनलाईन व्यवस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून चर्चमध्ये नाताळचे स्वागत करण्यात आले. सॅनिटायझर, थर्मल गन, आदींची व्यवस्था चर्चच्या प्रशासनाने केली. ६५ वर्षांवरील वृध्द आणि लहान मुलांना चर्चमध्ये प्रवेश दिला नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची व्यवस्था केली होती, असे वायल्डर मेमोरियल चर्चच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आनंद म्हाळुंगेकर यांनी सांगितले.
फोटो (२५१२२०२०-कोल-नाताळ फोटो, ०१) : कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने नाताळचे स्वागत करण्यात आले. न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२५१२२०२०-कोल-नाताळ फोटो ०२, ०४) : कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने नाताळचे स्वागत करण्यात आले. न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये मुख्य आचार्य (रेव्हरंड) यांनी संदेश दिला. यावेळी डावीकडून रेव्हरंड सिनाय काळे, जे. ए. हिरवे, अशोक गायकवाड उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२५१२२०२०-कोल-नाताळ फोटो ०५, ०६, ०७) : कोल्हापुरात शुक्रवारी नाताळनिमित्त न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)