शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मॉलमध्ये खरेदीत सवलतीचे अमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:36 PM

Crimenews, Kolhapurnews, police, गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानंतर मॉलमधून इलेक्ट्रीक वस्तू निम्म्या किमत्तीमध्ये मिळतील, अशी अमिष दाखवून १४ लाखांहून अधिकची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून मुंबईतील बाप लेकांनी कोल्हापुरातील सात जणांची फसवणूक केली असून त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देकोल्हापुरातील सात जणांना गंडा बोगस दिवाळी गिफ्ट कार्ड विकण्याचा प्रकार

कोल्हापूर : गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानंतर मॉलमधून इलेक्ट्रीक वस्तू निम्म्या किमत्तीमध्ये मिळतील, अशी अमिष दाखवून १४ लाखांहून अधिकची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या माध्यमातून मुंबईतील बाप लेकांनी कोल्हापुरातील सात जणांची फसवणूक केली असून त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

फसवणूक झालेल्या सात जणांच्यातर्फे असिफ सैदुल्ला पुणेकर (वय ४९, रा. नागाळा पार्क) यांनी तक्रार दिली. अविष्कार सुनील पाटील (वय २९) व वडील सुनील पाटील (दोघे रा. वरळी मुंबई) या संशियांतांवर गुन्हा नोंद झाला आहे.

शाहुपूरी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नागाळा पार्कमधील हिंद कॉलनी, केव्हीज पार्क येथे आसिफ पुणेकर राहतात. त्यांच्या भागात संशयित अविष्कार पाटील व सुनील पाटील हे राहण्यास आले होते. त्यातून त्यांची त्या दोघांबरोबर ओळख झाली.

संशयित अविष्कारने आपले वडील सुनील पाटील हे रिझर्व बँकेत नोकरीस आहेत. त्यांना दिवाळी निमित्त एका मॉलचे गिफ्ट कार्ड मिळाले आहे. कार्डद्वारे संबधित मॉलमधून कोणतीही इलेक्‍ट्रीक वस्तू ५० टक्के सवलतीने खरेदी करता येते असे अमिष दाखवले. याच पद्धतीने परिसरातील आणखी सहा जणांना कार्डचे अमिष दाखवले. त्याच्यावर विश्‍वास ठेऊन पुणेकर यांनी त्याला टप्प्याटप्याने ३ लाख ७५ हजार रूपये दिले.पुणेकर यांच्यासह सात जणांकडून सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० अखेर ऑनलाईन, रोखीने असे एकूण १४ लाख १ हजार रुपय घेतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना कोणत्याही इलेक्‍ट्रीक अगर इतर वस्तू त्यांना मिळवून दिल्या नाहीते. ते दोघे कोणालाही न सांगता पसार झाले असल्याची फिर्याद पुणेकर यांनी दिली.

त्यानुसार वरळी मुंबईतील संशयित अविष्कार व त्याचे वडील सुनील पाटील या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी