दरम्यान, या संशयितांकडून अशा प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी रावसाहेब बाबासाहेब खानविलकर (रा. रेंदाळ) यांनी हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, रावसाहेब खानविलकर हे जवाहर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूकदार म्हणून काम करतात. सन २०१८ ते २०२० या सालातील हंगामाकरिता खानविलकर यांनी मुकादम सखाराम आडे व अंकुश चव्हाण यांच्याबरोबर ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार केला होता. त्यापोटी खानविलकर यांनी करारात ठरल्याप्रमाणे आडे याच्या बँक खात्यात १५ लाख रक्कम भरली होती. मात्र आडे यांनी खानविलकर यांना कराराप्रमाणे मजूर पुरवले नाहीत. करार मोडल्यानंतर वेळोवेळी मागणी करूनही आडे व चव्हाण यांनी करारातील पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच खानविलकर यांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.
दरम्यान, हुपरी पोलिसांनी सखाराम आडे यास अटक केल्याची माहिती समजताच हुपरी परिसरातील अनेक ऊस वाहतूकदार पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते. इंगळी येथील ऊस वाहतूकदारांची सात लाख, तर कर्नाटक सीमाभागातील शमनेवाडीमधील दोघांची सुमारे सव्वीस लाख रुपयांची फसवणूक या टोळीने केल्याची चर्चा यावेळी सुरू होती.
याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे फसवणूकदारांनी सांगितले.