कोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जी.एस.टी.) कायद्याच्या १ जुलै २०१७ पासून अंमलबजावणी होत असून या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विक्रीकर कार्यालयात विशेष जी. एस. टी. सेल स्थापन केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे सहआयुक्त विलास इंदलकर यांनी दिली.विक्रीकर विभाग, केंद्रीय अबकारी विभाग आणि सीमा शुल्क विभाग हे संयुक्तपणे या कायद्याची अंमलबजावणी करणार आहेत. स्वतंत्र कक्षाची जबाबदारी विक्रीकर उपआयुक्त सचिन जोशी यांच्याकडे आहे. जी.एस.टी. बाबतचे सर्वप्रकारचे प्रशिक्षण सहाय्यक विक्रीकर आयुक्त नितीन बांगर आणि महाविकास यांच्या नियंत्रणाखाली पार पाडली जाणार असून व्यापारी, उद्योजक व नागरिकांच्यासाठी जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचे सनियंत्रण डॉ. अभिजित पोरे आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुकुंद पन्हाळकर हे करणार आहेत. संगणकीकृत जी.एस.टी. प्रणालीचे प्रशिक्षण ५ मे पर्यंत होत आहे. हा कायदा संगणकीकृत प्रणालीद्वारे राबविला जाणार असून त्याचे सॉफ्टवेअर इन्फोसेस या प्रख्यात कंपनीने विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर विभागातील मास्टर ट्रेनर्सना इन्फोसेस कंपनीमार्फत चेन्नई येथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थी विक्रीकर विभागातील ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना संगणकीय प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी कोल्हापूर विक्रीकर विभागामध्ये सुसज्ज संगणकीय प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.२५ एप्रिल : गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन २६ एप्रिल : सकाळी १०.३० वाजता रोटरी क्लब, इचलकरंजी २६ एप्रिल सकाळी १०.३० वाजता चेंबर्स आॅफ कॉमर्स, गडहिंग्लज २७ रोजी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, एमआयडीसी शिरोली जी.एस.टी.बाबत काही शंका असल्यास सहाय्यक विक्रीकर आयुक्त नितीन बांगर यांच्याशी (संपर्क ०२३१-२६८९२७४) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विक्रीकर कार्यालयात ‘जीएसटी’साठी स्वतंत्र सेल
By admin | Published: April 25, 2017 12:54 AM