पेठवडगाव : औषधांच्या नावाखालील गर्दी टाळण्यासाठी वडगाव पोलीस ठाणा हद्दीतील गावांमध्ये मोफत घरपोहोच औषधे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.गरजू, आजारी व वयस्कर नागरिकांना ती देण्यात येणार आहेत.
दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन करत विनाकारण रस्त्यांवर मोटरसायकलवरून फिरणाऱ्या ११० स्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून २५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे तीव्र मोहीम पोलिसांच्यावतीने करण्यात येणार आहे.
वडगाव पोलिसांनी सामाजिक उपक्रम सुरू केला. स्टार्क एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यातून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे.यासाठी रवींद्रनाथ माळी यांनी याचे नियोजन केले आहे. यासाठी 18002671488, 7499561488 यावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये एसटी स्टॅण्ड रोडवर भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. आजपासून त्यांना प्रतिबंध करण्यात आला, तर पालिका चौकात विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या ११० दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, हवालदार बाबासाहेब दुकाने, पोलीस नाईक विशाल हुबाले, रजनीकांत वाघमारे, धोंडीराम वड्ड, आकाश पाडळकर, अमोल माने, संदीप खोत आदींसह होमगार्ड सहभागी झाले होते.
पेठवडगाव : येथील पालिका चौकात पोलिसांनी कारवाई केलेली दुचाकी वाहने.