कोल्हापूर : कसबा बावडा येथील जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयात सोमवारी मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक यशवंत पाटील व उद्योगपती धनाजी गुरव हे उपस्थित होते. शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थांना प्रमुख पाहुण्यांच्या दातृत्वामुळे मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक मोहन आवळे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देऊन गणवेश वाटपासाठी आर्थिक निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल यशवंत पाटील व धनाजी गुरव यांचे आभार मानले.
यावेळीर् ंइयत्ता पहिली ते सातवीपर्र्यतच्या ४0 विद्यार्थांना पाहुण्यांच्या हस्ते मोफत गणवेश देण्यात आले. शाळेतील शिक्षक कुमार पाटील आणि अमित परीट यांनीसुध्दा आपल्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान केले.
याप्रसंगी यशवंत पाटील आणि धनाजी गुरव यांनी भविष्यातसुध्दा शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी पुष्पा गवंडी, मेघा सांडूगडे, विजय कुरणे, सुरेश आसवले यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन गोरख वातकर आणि सरदार पाटील यांनी केले. सूत्रसंचालन टी.आर.पाटील यांनी केले, तर बिराप्पा हाक्के यांनी आभार मानले.